Pages

नमस्कार मित्रांनो मी मनोज साळुंके ज्ञानज्योत ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करितो.या ब्लॉगमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे धन्यवाद,

Monday, 27 February 2017

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस




मराठी भाषा दिवस

 @ मराठी भाषा दिवस - २७ फेब्रुवारी


मराठी भाषा दिवस - जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.




कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते



@ विनम्र अभिवादन !!! 



कुसुमाग्रज यांच्या विषयी अधिक माहिती साठी ... 
क्लिक करा. 

 कुसुमाग्रज यांच्या कविता वाचण्यासाठी ... येथे क्लिक करा.

मराठी भाषा - विस्तृत माहितीसाठी ... येथे क्लिक करा.

मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!

@ २७ फेब्रुवारी २०१७ ला मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्याने
महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया
संयुक्तिकपणे, महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " हा उपक्रम आयोजित करीत आहेत. खालील पैकी कोणत्याही एका किंवा अनेक विषयांवर आपण मराठी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद माहिती लिहून ह्यात सहभागी होऊ शकता. 
  1. आपल्या गाव विषयी
  2. आपल्या शाळेविषयी/ महाविद्यालय /विद्यापीठविषयी
  3. राज्यस्तरीय आणि त्यावरील स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूविषयी

  4. मराठी भाषेविषयी मराठी संस्कृतीविषयी
  5. कुसुमाग्रज , मराठी साहित्यिक विषयी
  6. इंग्रजी विकिपीडियावरील एखाद्या चांगल्या लेखाचा मराठी अनुवाद/भाषांतर
  7. एखाद्या चित्रपटाविषयी
  8. एखाद्या - तीर्थस्थळ ,नद्या, धरणे, पर्वतरांगा , पर्यटन स्थळ विषयी
  9. कलाकाराविषयी ( अभिनेता,गायक,चित्रकार, शिल्पकार,व्यंगचित्रकार,संगीतकार इ.)

No comments:

Post a Comment