Pages

नमस्कार मित्रांनो मी मनोज साळुंके ज्ञानज्योत ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करितो.या ब्लॉगमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे धन्यवाद,

मराठी व्याकरण

मराठी संपुर्ण व्याकरण इ.१ ते ८ सोप्या भाषेत
==================================
==================================

🔸🔶मराठी व्याकरण

1}नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
          उदाहरण - घर, आकाश, गोड
==================================


2}    सर्वनाम - जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
      उदाहरण - मी, तू, आम्ही

==================================



3}    विशेषण - जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
     उदाहरण - गोड, उंच


==================================



4}    क्रियापद - जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
      उदाहरण - बसणे, पळणे


==================================



 5}   क्रियाविशेषण - जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
      उदाहरण - इथे, उद्या


==================================



  6}  शब्दयोगी अव्यय - जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
      उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

==================================



  7}  उभयान्वयी अव्यय - जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
      उदाहरण - व, आणि, किंवा


==================================



  8}  केवलप्रयोगी अव्यय - जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
     उदाहरण - अरेरे, अबब
==================================
==================================
==================================
==================================


•●•~~शब्द विकाराचे प्रकार~~•●•

काही शब्द जेंव्हा वाक्यात वापरले जातात तेंव्हा मूळ शब्दास प्रत्यय लागून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. ज्या विविध कारणामुळे मुळ शब्दात बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात.

१) वचन २) लिंग ३) पुरुष ४) विभक्ती ५) काळ

-------------•○●वचन●○•-------------

एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.

1)   एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
      उदाहरण - अंबा, घोडा, पेढा

==================================



2)  अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
      उदाहरण - अंबे, घोडे, पेढे
==================================
==================================




----------•○●लिंग●○•------------

एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
  
1)  पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
      उदाहरण - मुलगा, घोडा, कुत्रा

==================================




2)   स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
उदाहरण - मुलगी, घोडी, कुत्री

==================================



3) नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
      उदाहरण - मुल, पिल्लू, पाखरू

==================================
==================================
==================================




-------------•••पुरुष•••-----------------

एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.

      प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.

==================================




      द्वितीय पुरुषवाचक: : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.

==================================



      तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
==================================
==================================
==================================



-----------•○●विभक्ती●○•----------

वाक्यात येणार्‍या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध असतो व हा संबंध दाखवण्या साठी जो नामात किंवा सर्वानामात बदल करतात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे एकूण ८ प्रकार आहेत.
[स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ: गुलकंद , चिंच, तंटा , आंबा

नियम १.२ [ संपादन ]
तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल
विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत
नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर
येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील
अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.
उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन,
पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत,
अंबुज=अम्बुज.
==================================



नियम १.३ [ संपादन ]
पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम
शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले
मराठी शब्द शीर्षबिंदू ( अनुस्वार) देऊनच
लिहावेत.
उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे
शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे
लिहू नयेत.
==================================




नियम १.४ [ संपादन ]
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-
सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
उदाहरणार्थ:
वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान,
देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.

==================================



नियम १.५ [ संपादन ]
काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार
अस्पष्ट असतो. कधीकधी तो
उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर
अनुस्वार देऊ नये.
उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें,
कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा,
कोठे, कधी, काही' असे लिहावेत.

==================================



नियम २: [संपादन ]
अनुस्वार
नियम २.१ [ संपादन ]
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या
अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ
शीर्षबिंदूने दाखवावा.
उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद,
दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द
'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श,
दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू
नयेत.
==================================




नियम ३ [संपादन ]
अनुस्वार
नियम ३.१ [ संपादन ]
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी
सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व
शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार
द्यावा.
उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी,
तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

==================================



नियम ३.२ [ संपादन ]
आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा
अनुस्वार दिला पाहिजे.
उदाहरणार्थ: राज्यपालांचे,
मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस,
शिक्षकांना, अध्यक्षांचे.
==================================



नियम ४ [संपादन ]
अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त
कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने
सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ
नयेत.
या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं,
नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे,
पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी'
असे लिहावेत.
==================================



नियम५ [संपादन ]
ऱ्हस्व-दीर्घ नियम
नियम५.१ [संपादन ]
मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-
कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी,
गति=गती.
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व
उकार दीर्घ लिहावा.
उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू
==================================




नियम५.२ [संपादन ]
'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम
अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

==================================



नियम ५.३ [ संपादन ]
व्यक्तिनामे , ग्रंथनामे , शीर्षके व सुटे
ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त
लिहावेत.
उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण,
पद्धती, कुलगुरू.

==================================



नियम ५.४ [ संपादन ]
'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन
अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

==================================

4 comments:

  1. चांगली माहिती आहे, सुरू ठेवा, अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  2. श्री.मनोज साळुंके सर ,खूप आनंद झाला आपल्या ब्लोग ला भेट देवून , एका शिक्षकाचा वाद्यार्थ्यांसाठीचा प्रामाणिक पणा पाहायला मिळाला. keep it up. from- Lai Bhari Naukri

    ReplyDelete