Pages

नमस्कार मित्रांनो मी मनोज साळुंके ज्ञानज्योत ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करितो.या ब्लॉगमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे धन्यवाद,

Monday 27 February 2017

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस




मराठी भाषा दिवस

 @ मराठी भाषा दिवस - २७ फेब्रुवारी


मराठी भाषा दिवस - जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.




कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते



@ विनम्र अभिवादन !!! 



कुसुमाग्रज यांच्या विषयी अधिक माहिती साठी ... 
क्लिक करा. 

 कुसुमाग्रज यांच्या कविता वाचण्यासाठी ... येथे क्लिक करा.

मराठी भाषा - विस्तृत माहितीसाठी ... येथे क्लिक करा.

मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!

@ २७ फेब्रुवारी २०१७ ला मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्याने
महाराष्ट्र शासन आणि मराठी विकिपीडिया
संयुक्तिकपणे, महाजालावरील मराठी भाषेतील माहिती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने "एक परिच्छेद मराठी विकिपीडियावर " हा उपक्रम आयोजित करीत आहेत. खालील पैकी कोणत्याही एका किंवा अनेक विषयांवर आपण मराठी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद माहिती लिहून ह्यात सहभागी होऊ शकता. 
  1. आपल्या गाव विषयी
  2. आपल्या शाळेविषयी/ महाविद्यालय /विद्यापीठविषयी
  3. राज्यस्तरीय आणि त्यावरील स्तरावर यश मिळवलेल्या खेळाडूविषयी

  4. मराठी भाषेविषयी मराठी संस्कृतीविषयी
  5. कुसुमाग्रज , मराठी साहित्यिक विषयी
  6. इंग्रजी विकिपीडियावरील एखाद्या चांगल्या लेखाचा मराठी अनुवाद/भाषांतर
  7. एखाद्या चित्रपटाविषयी
  8. एखाद्या - तीर्थस्थळ ,नद्या, धरणे, पर्वतरांगा , पर्यटन स्थळ विषयी
  9. कलाकाराविषयी ( अभिनेता,गायक,चित्रकार, शिल्पकार,व्यंगचित्रकार,संगीतकार इ.)

Wednesday 22 February 2017

संत गाडगे महाराज

संत गाडगे महाराज

संत गाडगे महाराज जयंती

@ संत गाडगे महाराज जयंती @


  @ विनम्र अभिवादन ! @




नाव - डेबूजी झिंगराजी जानोरकर ( गाडगे बाबा )
जन्म - फेब्रुवारी २३, १८७६
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू -  २० डिंसेंबर १९५६
वलगांव (अमरावती)

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

@ गाडगे महाराजांविषयी अधिक माहिती साठी ... येथे क्लिक करा.


@ संत गाडगेबाबा ( गाडगे महाराज ) @

(२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिंसेंबर १९५६). एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि.  अमरावती ) येथे परीट जातीत  झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व  आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा  ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.@ 
लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता.
‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.
स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.
लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्‍नही  असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी  लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या.
अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी  समाजास दिली.
‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही.
समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व  त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात.
गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

Saturday 11 February 2017

शैक्षणिक Apps

शैक्षणिक Apps

@ लहान मुलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी काही उपयुक्त शैक्षणिक Apps ( For Android Mobile ) ....


1) मराठी - इंग्रजी डिक्शनरी 
 मराठी शब्दांचा इंग्रजीतून अर्थ जाणून घेण्यासाठी तसेच इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ जाणून घेण्यासाठी उपयुक्त असे हे डिक्शनरी App आहे. हे Apps download केल्यानंतर ते offline चालते. नेटची आवश्यकता नसते. तसेच इंग्रजी शब्दांचे उच्चार ( pronunciation ) सुद्धा यात ऐकायला मिळतात.
2) मराठी सामान्यज्ञान २०१६
 स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तसेच विविध विषयांशी संबंधित सामान्यज्ञान व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी उपयुक्त असे हे मराठी App आहे.
3) English Grammar in Marathi
 इंग्रजी व्याकरण शिका , आता मराठीतून ...
 मराठीतून इंग्रजी व्याकरण शिकण्यासाठी / समजून घेण्यासाठी उपयुक्त असे हे App आहे.
4) मराठी बालगीते
  मराठी बालगीते या App मध्ये १५० पेक्षा जास्त बालगीते व बडबडगीते आहेत.
5) मराठी किडस् स्टोरी
  मराठी किडस् स्टोरी या App मध्ये लहान मुलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी मराठीत १०० पेक्षा जास्त गोष्टी आहेत.
6) मराठी किडस् 
  उजळणी , पाढे , बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार , चढता उतरता क्रम , मापन , आकार असे विभाग .. लहान मुलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा सराव करण्यास उपयुक्त असे App.
7) मराठी शब्दकोडे
 मराठी शब्दकोडे ... Puzzle game
8) मराठी सुविचार
 भरपूर मराठी सुविचार.
9) मराठी बालवाडी
 लहान मुलांना मराठी शिकण्यासाठी उपयुक्त App
10) महाराष्ट्रातील किल्ले 
 महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची माहिती ,शिवरायांच्या काळातील किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी उपयुक्त App
11) मराठी म्हणी व वाक्प्रचार
  मराठी म्हणी , वाक्प्रचार , शब्द समूहाबद्दल एक शब्द , समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द यांची माहिती
12) ५वी स्कॉलरशिप मराठी व्याकरण 
 इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा सराव / अभ्यास करण्यास उपयुक्त App
13) संपूर्ण मराठी व्याकरण 
 मराठी भाषेच्या / व्याकरणाच्या तयारी साठी उपयुक्त App
14) मराठी बोधकथा
 लहान मुलांना चांगला बोध घेता येईल अशा बोधकथांचा समावेश ह्या App मध्ये आहे.
15) खेळ गणिताचा   मराठी - गणित विषयक सराव खेळातून
16) राष्ट्ररत्न
 भारतातील थोर नेत्यांचीमाहिती देणारे App
17) इंग्रजी शिका मराठीतून
  इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त App. इंग्रजी संभाषणे , दररोजच्या वापरातील वाक्ये , विविध म्हणी , इंग्रजी बोलण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स्
18) ABC For KIDS
 This is an educational game for kids in which childrens learn alphabets and write letters.
19) Kids Nursery Rhymes
  This is one of the best app for kids to learn rhymes ( 50 rhymes )
20

Tuesday 7 February 2017

विज्ञान विषयक पुस्तके

विज्ञान विषयक पुस्तके

@ विज्ञान विषयक पुस्तके

@  विज्ञान  विषयक पुस्तके .....

विविध विज्ञान विषयक पुस्तके डाऊनलोड करा , 

आता फक्त एका क्लिक वर ...


 भारत ज्ञान विज्ञान समिती  तर्फे जन वाचन आंदोलन मोहिमे साठी प्रकाशित पुस्तके .... 


पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.



  1. भूकंप
  2. मेरी क्युरी
  3. प्लुटो ( शोधांच्या कथा )
  4. सी. व्ही. रामन
  5. सरड्याचे स्वप्न
  6. सूर्यप्रकाश
  7. सामाजिक विज्ञान
  8. विज्ञान सोपे सहज
  9. बिनीचे प्राणी
  10. यंत्रमानव
  11. संवेदना
  12. मेंदू
  13. प्रकाशाचा वेग
  14. विज्ञान प्रयोग सोपे
  15. प्रकाश संश्लेषण
  16. उर्जा आणि स्वावलंबन
  17. खेळण्यांची दुनिया
  18. विज्ञानाचे खेळ
  19. धुमकेतू
  20. सामना बुद्धीचा
  21. सूर्य तुझाच आहे
  22. विज्ञान शिक्षण
  23. विज्ञान समजून घेण्याची तयारी
  24. नेपच्यून
  25. विज्ञानेतिहास ( प्राचीन विज्ञान )
  26. पोपट
  27. पृथ्वी गोल आहे
  28. पोस्टकार्डातून विज्ञान
  29. दुनिया सर्वांची
  30. पाण्याशी खेळूया