Pages

नमस्कार मित्रांनो मी मनोज साळुंके ज्ञानज्योत ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत करितो.या ब्लॉगमध्ये विविध प्रकारची शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे धन्यवाद,

विज्ञानाचे सोपे प्रयोग

विज्ञानाचे सोपे प्रयोग

विडिओ डाउनलोड करण्यासाठी 



👉👉येथे क्लिक करा👈👈

�� विज्ञानातील सोपे प्रयोग ��
��भाग ��
������������������
�� खार्या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणीपरातजड भांडेप्लॅस्टिकचा कागद,दोरीकाचेची गोटी.कृती – एक परात घ्यापरातीच्या मध्यभागीपरातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवापरातीत खारे पाणी(विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचेखाडीचे पाणीभरा.आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवापरातीवरदोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा.कागदावर एक काचेची गोटी ठेवागोटी मध्यभागी जाऊन थांबेलआणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकारहोईलहे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा.पाणी तापेलत्याची वाफ होईलप्लॅस्टिकच्या कागदावरपाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईलकागदाच्या मध्याकडेघरंगळत जाईलजड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंबपडेल.पाण्याचीच वाफ होतेत्यातल्या क्षाराची होत नाही.
��सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूलखडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूलघ्यात्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढाएक खडू हातातघ्यासर्वात मधली बी शोधून काढात्या बीला लागून असलेलीबी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडादुसर्या बीला लागूनअसलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीतबसेलअशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असाचक्राकार कंस काढाआता दुसरी सर्वात आतली आणि खडूचीखूण नसलेली बी शोधातिच्यापासून सुरू होणारा आधीच्याकंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढाअसे एकाच दिशेनेजाणारे सर्व कंस काढामग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतातया संख्याफिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.
��रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हातपट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबीमोजायची आहेकोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा.नोंदवून ठेवा. (). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबीमोजानोदवून ठेवा. (). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतचीलांबी मोजानोदवून ठेवा. ().  आणि  यांचे गुणोत्तर काढा.तसेच  आणि  यांचे गुणोत्तर काढादोन्हीचे उत्तर सुमारे.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतातएका सरळरेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचेगुणोत्तरलहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतकेअसेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतातआपला हात रम्यगुणोत्तरात असतो.
��बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्चीकृत्रीम धाग्याचे कापडएकव्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा.एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉनटेरिलिनपॉलिइस्टरयांपैकी – कापडाचा मोठा तुकडा घ्यासदरासाडी काहीहीचालेलत्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला.कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्यादिसतीलहा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील.कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतोसावधपणे प्रयेगकरा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युतनिर्माण होतेतिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयारहोतेदोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्यापडतात.
��अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात - डावखोर्यांनीउजवा आणि उजखोर्यांनी डावा – सरळ जमिनी समांतर ताणा.तो हात कोपर्यात दुमडादुसर्या हाताच्या मधल्या बोटानेकोपर्याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्यातुम्हालाविजेचा झटका बसलेला जाणवेलयावरून तुमच्या अंगात वीजआहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीचजवळ असतेनसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबूनअसतेआपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तातसोडीयम जास्त असतोत्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभारनिर्माण होतो.
��सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसाकागदकात्रीपट्टीपेन्सिलकंपास.कृती –एका आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटरत्रिज्येचे वर्तुळ काढावर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यातोकागद एका आरशावर चिकटवाआरसा घराबाहेर उन्हात ठेवा.वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्याआरसाभितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेलकवडसावगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी कराकवडशामध्ये काहीकाळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेतकवडशातढगही हालताना दिसतीलआरशावरून परावर्तित झालेलासूर्यप्रकाश कमी प्रखर होतोतो भिंतीवर पडून परावर्तीत होतानात्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायलालागतात.
��संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्तीकाड्यापेटीसंत्रीकृती – संत्र्याची सालसोलाआतल्या फोडी खाऊ शकताएक मेणबत्ती काड्यापेटीनेपेटवातिची ज्योत स्थिर राहू द्यासंत्र्याच्या सालीचा एकतुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरामेणबत्तीच्याज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबासालीतून उडालेले शितोंडेप्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेलअसतेदाबल्यावर त्याचे तुषार उडतातमेणबत्तीच्या ज्योतिमुळेपेटतात  संपून विझतात.
��मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजूबदामपिस्तेफ्रिजकृती – मऊपडलेले काजूबदामपिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येतनाहीते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीतपसरून ठेवाती बशी फ्रिजच्या आत ठेवाकाही तासांनी बशीबाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणीआत शिरल्याने सुकामेवा मऊ होतोफ्रिजमध्ये हवा गार आणिकोरडी असतेकोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेरफेकला जातो.
��आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागदसदाफुलीची फुलेकात्रीलिंबू,सोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला – वहीचा कागद घ्या.कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद.सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीतकराकागद ओलसर झाला तरी चालेलकागद कडक होईपर्यंतवाळवायातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंबटाकाकोणता रंग येतोअशाच दुसर्या तुकड्यावर ओलसरकरून सोड्याची चिमूट टाकाकोणता रंग येतो पहादोन रंगवेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झालीझाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवाकात्रीनेकागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्यापाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.
��हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्य – मीठखाण्याचा सोडाछोटा खलबत्ताचमचा,आम्लतादर्शक पट्टीअमोनिया.कृती – छोट्या खलबत्त्यात एकचमचा कोरडे मीठ घालातसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला.बत्त्याने हे मिश्रण खलत रहाआंबूस वास येईलत्यावेळीओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल.अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्यातो खलाजवळआणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठआणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजनक्लोराईड वायू मुक्त होतो  खलात धुण्याचा सोडा तयार होतो.अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजनक्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपाततयार होतो.
❄❄❄❄❄❄❄❄❄

माहिती आवडल्यास अभिप्राय लिहायला विसरू नका 

2 comments:

  1. please remove this welcome highlighter,it create difficulties to read the material

    ReplyDelete